News Flash

जयललिता यांच्या संपत्तीत घट

गेल्या वर्षीपेक्षा ही मालमत्ता ३.४० कोटी रुपयांनी कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संग्रहित छायाचित्र

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अभाअद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज सादर करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ११३.७३ कोटी रुपये संपत्तीअसल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षीपेक्षा ही मालमत्ता ३.४० कोटी रुपयांनी कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थावर मालमत्ता ४१.६३ कोटी रुपये तर जंगम मालमत्ता ७२.०९ कोटी रुपये असल्याचे जयललिता यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्याचप्रमाणे ४१ हजार रुपये रोकड आणि २.०४ कोटी रुपयांची देणी असल्याचे नमूद केले असून कृषी व्यवसाय असल्याचे म्हटले आहे.

गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी जयललिता यांनी ११७.१३ कोटी रुपयांची (४५.०४ कोटी रुपये स्थावर आणि ७२.०९ कोटी रुपये जंगम) मालमत्ता असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2016 4:31 am

Web Title: jayalalithaas assets decline
टॅग : Jayalalithaa
Next Stories
1 भारत-पाक परराष्ट्र सचिवांमध्ये आज चर्चा
2 इस्रोच्या अवकाश तंत्रज्ञानातून हृदयासाठी कृत्रिम पंपाची निर्मिती
3 उमर खलिदसह तिघे जेएनयूतून निलंबित
Just Now!
X