News Flash

प्रसिद्ध अभिनेत्री सापडली मृतावस्थेत, आत्महत्येचा संशय

तिचे अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरुन तिला श्रद्धांजली वाहिली.

बिग बॉसमधील माजी स्पर्धक आणि कन्नड अभिनेत्री जयश्री रमैया सोमवारी दुपारी मृतावस्थेत सापडली. बंगळुरुतील वृद्धाश्रमात तिचा मृतदेह आढळला. हे आत्महत्येचे प्रकरण असण्याची दाट शक्यता आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून जयश्री नैराश्याचा सामना करत होती. तिने तिच्या सोशल मीडिया पेजवरुन जीवन संपवण्याचेही संकेत दिले होते.

बिग बॉस कन्नडच्या तिसऱ्या सीझनमधून तिला प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूने कन्नड चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे. तिचे अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरुन जयश्रीला श्रद्धांजली वाहिली.

मागच्यावर्षी २०२० मध्ये नैराश्याचा सामना करत असल्याचे तिने सांगितले. २२ जूनला जयश्रीने तिच्या फेसबुकवर आपल्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचे लिहिले होते. ‘गुडबाय’ असे तिने एफबी पोस्टमध्ये म्हटले होते. पण नंतर तिने ती पोस्ट डिलीट केली व ‘मी व्यवस्थित आणि सुरक्षित आहे. लव्ह यू ऑल’ असे लिहिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 4:55 pm

Web Title: jayashree ramaiah found dead in bengaluru in suspected suicide dmp 82
Next Stories
1 लव्ह मॅरेजला आई-वडिलांचा विरोध, प्रेयसीची भारतात, तर प्रियकराची दुबईमध्ये आत्महत्या
2 पंतप्रधान मोदी, दाढी अन् ‘सामना’… भाजपा नेत्याने दिलं उत्तर
3 मास्क घालण्यास नकार देणारे ‘या’ देशाचे राष्ट्राध्यक्षच निघाले करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X