28 February 2021

News Flash

JEE Main परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; चार टप्प्यात होणार परीक्षा

चार ते पाच दिवसांत जाहीर होणार निकाल

JEE Main Exam 2021 (संग्रहित छायाचित्र)

‘आयआयटी’सह इतर काही केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात ‘जेईई मेन्स’ वर्षभरात चार सत्रात घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी ही माहिती दिली. पहिल्या सत्रातील परीक्षा फेब्रवारीमध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेनंतर ४ ते ५ दिवसात निकाल जाहीर होईल, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.

करोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. केंद्र व राज्य सरकारांकडून घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांचाही खोळंबा झाला होता. मात्र, नव्या वर्षात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं जेईई मेन्स परीक्षेसाठी वेळापत्रक निश्चित केलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी याची माहिती दिली.

जेईई मेन्स परीक्षा पुढच्या वर्षी चार टप्प्यात (सत्रात) घेतली जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात टप्प्याटप्प्यानं ही परीक्षा घेतली जाणार आहे. पहिलं सत्र २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. परीक्षेचा निकाल लगेच जाहीर केला जाणार आहे. परीक्षेच्या अखेरच्या तारखेनंतर चार ते पाच दिवसांत निकाल प्रसिद्ध केला जाणार असल्याचं रमेश पोखरियाल निशांक यांनी सांगितलं.

मागील शैक्षणिक सत्रात जेईई व नीट परीक्षांच्या काळातच करोनाचा प्रादूर्भाव झाला होता. त्यामुळे अनेक वेळा परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. विशेष म्हणजे परीक्षा रद्द करण्याची मागणी पुढे आली होती. त्यावरून सर्वोच्च न्यायालयापर्यंत रणकंदन झालं होतं. मात्र, आगामी वर्षासाठी सरकारनं आधीच नियोजन करत परीक्षेचं वेळापत्रक निश्चित केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 6:58 pm

Web Title: jee main exam 2021 exam will be held in four sessions first session february 23 to 26 bmh 90
Next Stories
1 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘गोड भेट’; मोदी सरकार देणार ३,५०० कोटींचं अनुदान
2 राम मंदिराच्या उभारणीसाठी मकर संक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत निधी संकलन; चंपतराय यांची माहिती
3 काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?; चावडा यांनी दिला प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा
Just Now!
X