News Flash

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

एका दहशतवाद्यास पकडण्यात यश, मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा जप्त

संग्रहीत

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठा दहशतवादी हल्ला परतवून लावण्यात यश आले आहे. श्रीनगरमधील परिम पोरा भागातील लष्कराच्या चेक पोस्टवर हा दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. यानंतर जवानांकडून देण्यात आलेल्या चोख प्रत्युत्तरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

विशेष म्हणजे या परिसरात जवानांनी राबवलेल्या शोधमोहीमेनंतर एका जखमी दहशतवाद्यास पकडण्यात देखील यश आले. शिवाय, घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

या अगोदर जम्मू काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. दहशतवाद्यांनी अगोदर पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर ते घनदाट जंगलाच्या दिशेने पसार झाले होते. दरम्यान एक दहशतवादी गोळीबारात ठार झाला होता, तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले होते. नंतर झालेल्या चकमकीत इतर दोन दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला. या कारवाईत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 2:06 pm

Web Title: jk terrorists attacked a check post in parim pora srinagar msr 87
Next Stories
1 Viral Video: हिटलरच्या मुखात मोदींचे शब्द; कामरा का हमला
2 भारत आता लोकशाही देश राहिलाय का? प्रियंका गांधींचा सवाल
3 CAA मुस्लीम विरोधी नाही – रजनीकांत मोदी सरकारच्या पाठिशी
Just Now!
X