दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा एमफिलचा विद्यार्थी रजनी मुथ्थुकृष्णनने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनी हा जस्टिस फॉर रोहित वेमुला मुव्हमेंटचा सक्रिय सदस्य होता. तो मुळचा तामिळनाडूचा होता.
रजनीने आपल्या फेसबुकवरील अखेरच्या पोस्टमध्ये समानतेविषयी भाष्य केलं आहे. समानता मिळाली नाही तर काहीच मिळत नाही. एमफिल आणि पीएच.डी प्रवेशासाठी समानता नाही. मौखिक परीक्षेत समानता नाही, अशा आशयाची पोस्ट त्याने केली होती.