जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भाषा विषयाच्या एका विद्यार्थिनीचा सहाध्यायी विद्यार्थ्यांने विनयभंग केला.
पोलिसांच्या मते ही घटना शनिवारी घडली असून त्याबाबत वसंतकुंज उत्तर येथे प्राथमिक माहिती अहवाल सादर करण्यात आला आहे. ही मुलगी अभ्यासासाठी वाचनालयात गेली असता त्या मुलाने तिचा हात धरला. ग्रंथपालांना सांगूनही काही कारवाई न करण्यात आल्याने तिने पोलिसात तक्रार केली.
याच विद्यापीठात एका पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थिनीवर एकाने लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याची तक्रारही पोलिसात दाखल झाल्याचे सूत्रांनी या वेळी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2014 रोजी प्रकाशित
नेहरू विद्यापीठात विद्यार्थिनीचा विनयभंग
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भाषा विषयाच्या एका विद्यार्थिनीचा सहाध्यायी विद्यार्थ्यांने विनयभंग केला.
First published on: 16-11-2014 at 04:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jnu student molested in the campus library