कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण होईल असा ढोबळ अंदाज अनेक कल चाचण्यांनी वर्तवला होता. मात्र त्यातील काही चाचण्यांचा अंदाज अधिक अचूक ठरल्याचे दिसून येत आहे.

मतमोजणीच्या आकडेवारीनुसार भाजपला १०४, काँग्रेसला ७८, जेडीएसला ३७ आणि अन्य उमेदवारांना ३ जागा मिळत असल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजपला ९२ जागांवर विजय मिळाला असून १२ जागांवर भाजपच्या उमेदवारांना आघाडी आहे. तर काँग्रेसला ७३ जागांवर विजय मिळाला असून ५ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

> एबीपी-सी वोटर चाचणीनुसार भाजपला १०४ ते ११६, काँग्रेसला ७२ ते ७८, जेडीएसला २० ते २९ आणि अन्य उमेदवारांना ० ते ७ जागा मिळतील असा अंदाज होता.

> रिपब्लिक टीव्ही जन की बात चाचणीत भाजपला ९५ ते ११४, काँग्रेसला ७३ ते ८२, जेडीएसला ३२ ते ४३ आणि अन्य उमेदवारांना २ ते ३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता.

> द टाइम्स नाऊ- व्हीएमआर चाचणीत भाजपला ९४, काँग्रेसला ९७, जेडीएसला २८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता.

> टाइम्स नाऊ – चाणक्य चाचणीने भाजपला १२०, काँग्रेसला ७३ आणि जेडीएसला २६ जागा मिळतील असे म्हटले होते.

> इंडिया टुडे – अ‍ॅक्सिस चाचणीने काँग्रेसला १०६ ते ११८, भाजपला ७९ ते ९२, जेडीएसला २२ ते ३० जागा मिळतील असे म्हटले होते.

> एनडीटीव्हीच्या द पोल ऑफ एग्झिट पोल्समध्ये भाजप, काँग्रेस आणि जेडीएसला अनुक्रमे ९७, ९० आणि ३१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता.