News Flash

कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोट सुरक्षा; शिवकुमार यांना हॉटेलबाहेर रोखले

या नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहेत.

कर्नाटक विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार मुंबईतल्या पवई येथील रेनिसन्स हॉटेलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. या नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहेत. शिवकुमार हॉटेल परिसरातही पोहोचले मात्र, त्यांना या आमदारांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले आहे. दरम्यान, आमदारांच्या विनंतीनुसार, हॉटेलबाहेर एसआरपीएफ आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.


सुत्रांच्या माहितीनुसार, आपली समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि काँग्रेस नेते शिवकुमार मुंबईत येत असल्याची खबर मिळतात बंडखोर आमदारांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनना पत्र लिहून आपल्याला या नेत्यांची भिती वाटत असून आम्हाला त्यांची भेट घेण्याची इच्छा नाही त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये, अशी विनंती केली होती.

आमदारांच्या या विनंती पत्रानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला असून रेनिसन्स हॉटेलबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. १० आमदारांनी सुरक्षेची विनंती केल्यानंतर एसआरपीएफ आणि आरएएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत हे देखील हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.

दरम्यान, जेडीएसच्या बंडखोर आमदारांचे समर्थक नारायण गौडा यांनी हॉटेलबाहेर शिवकुमार यांच्याविरोधात परत जा…परत जा…अशी घोषणाबाजी केली.

यावेळी शिवकुमार माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी या हॉटेलमध्ये रुम बुक केली आहे. माझे मित्र येथे थांबले आहेत त्यांची एक छोटाशी अडचण झाली आहे. त्यावर आम्ही तोडगा काढणार आहोत. इतक्या लवकर आम्ही वेगळे होणार नाही. आम्ही प्रत्येकाचा आदर आणि प्रेम करतो त्यामुळे त्यांना आमच्यापासून धोका असण्याचा प्रश्नच येत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 8:57 am

Web Title: karnataka mla has security in mumbai sivakumar was stopped outside the hotel aau 85
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 स्विस बँकांतील भारतीयांच्या गुंतवणुकीचा लवकरच उलगडा
3 आंतरजातीय विवाहातून गुजरातमध्ये दलिताची हत्या
Just Now!
X