08 March 2021

News Flash

लंडन : पाक समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयावर फेकली अंडी, दगडफेकीमुळे फुटल्या इमारतीच्या काचा

भारतीय अधिकाऱ्यांनी लंडनच्या महापौरांकडे केली तक्रार

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाचा पाकिस्तान विविध स्थरांवर सातत्याने विरोध करत आहे. मंगळवारी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या इमारतीला लक्ष्य केलं. मोठ्या संख्येने जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर अंडी फेकली, तसंच दगडफेक देखील करण्यात आली. परिणामी खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. वृत्तसंस्था एएनआयने याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.

भारतीय उच्चायुक्तालयाने इमारत परिसरात झालेल्या हल्ल्याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली असून, फोटो शेअर केले आहेत. भारतीय अधिकाऱ्यांनी लंडनच्या महापौरांकडे याबाबतची तक्रार देखील केली आहे. तसंच, निदर्शनकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानी समर्थकांनी या विरोध प्रदर्शनाला ‘काश्मीर फ्रीडम मार्च’ नाव दिलं होतं. पार्लमेंट स्क्वेअरपासून भारतीय उच्चायुक्तालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. याचं नेतृत्त्व युकेमधील लेबर पार्टीच्या काही खासदारांनी केलं. मोठ्या संख्येने जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी कलम 370 हटवण्याविरोधात नारेबाजी करत दगडफेक केली. निदर्शनकर्त्यांच्या हातात पाकिस्तान अधिकृत काश्मीर(पीओके)चे झेंडे होते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार जवळपास दहा हजार पाकिस्तानी समर्थकांनी दगडफेक केली.

यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी देखील पाकिस्तानी समर्थकांनी लंडनमध्ये निदर्शनं केली होती. त्यावेळी त्यांच्या हातात पाकिस्तान आणि काश्मीरचे झेंडे होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 9:19 am

Web Title: kashmir article 370 scrapped indian high commission targeted in london by pakistan supporters sas 89
Next Stories
1 बुकरच्या लघुयादीत रश्दी आणि मार्गारेट अ‍ॅटवूड
2 आठ अ‍ॅपाची हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलात दाखल
3 रोमिला थापर यांना प्राध्यापक संघटनेचे पाठबळ
Just Now!
X