News Flash

Kerala Nun Rape Case: फ्रँको मुलक्कलला सशर्त जामीन

ननवरील बलात्काराप्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कल याला सप्टेंबर महिन्यात केरळ पोलिसांनी अटक केली होती. २०१४ ते २०१६ या दोन वर्षात बिशप फ्रँकोने बलात्कार केल्याचा आरोप ननने

केरळमधील ननवरील बलात्काराप्रकरणी फ्रँको मुलक्कल याला केरळ हायकोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. २०१४ ते २०१६ या दोन वर्षात बिशप फ्रँकोने बलात्कार केल्याचा आरोप ननने केला होता.

ननवरील बलात्काराप्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कल याला सप्टेंबर महिन्यात केरळ पोलिसांनी अटक केली होती. २०१४ ते २०१६ या दोन वर्षात बिशप फ्रँकोने बलात्कार केल्याचा आरोप ननने केला होता. सध्या फ्रँको मुलक्कल हा न्यायालयीन कोठडीत असून त्याने केरळ हायकोर्टात जामीन अर्ज केला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली असून हायकोर्टाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला आहे.

हायकोर्टाने फ्रँको मुलक्कलला सशर्त जामीन मंजूर केला. केरळ हायकोर्टाने मुलक्कल याला जामीन मंजूर करताना केरळमध्ये प्रवेश करु नये, तसेच न्यायालयात पासपोर्ट जमा करावा, असे आदेश दिले आहेत.

दरम्यान, फ्रँको मुलक्कलच्या कोठडीसाठी पोलिसांनी कोर्टात वैद्यकीय अहवालाचा दाखला दिला होता. यात वैद्यकीय चाचणीतून महिलेवर अत्याचार केल्याचे उघड झाल्याचे म्हटले होते. फ्रँको मुलक्कल याने अधिकाराचा गैरवापर करत ननवर बलात्काराचा केल्याचे यात म्हटले होते. तीन दिवस कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मुलक्कलला अटक केली होती. या आरोपानंतर फ्रँको मुलक्कलला बिशप पदावरुन मुक्त करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 11:56 am

Web Title: kerala nun rape case bishop franco mulakkal gets conditional bail by high court
Next Stories
1 कोळसा घोटाळा: काँग्रेस नेते नवीन जिंदाल यांना जामीन मंजूर
2 VIDEO: हिंदू नाही वाटत, भारतीय शास्त्रज्ञाला अमेरिकेत गरब्याच्या कार्यक्रमातून काढले बाहेर
3 भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापकांची हत्या
Just Now!
X