07 March 2021

News Flash

जम्मू काश्मीरमध्ये सात दहशतवाद्यांचा खात्मा, घातपाताचा डाव उधळला

जम्मू काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये पाच ते सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मागील 36 तासांमध्ये भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये पाच ते सात दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पाकिस्तानी बॉर्डर एक्शन टीमकडून करण्यात येणाऱ्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्टकराने हाणून पाडला आहे. पाकिस्तानी सैनिक/दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप मिळाले नाहीत. कारण, अद्याप भारतीय लष्कर आणि दहशतावद्यांमध्ये चकमक सुरूच आहे.

मागील काही दिवसांपासून लष्कराने काश्मिरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. गुरूवारी झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते. तर बांदीपोरा जिल्ह्यात मंगळवारी सीमा रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 8:44 pm

Web Title: keran sector 5 7 pakistani army regularsterrorists eliminated their bodies are lying on the loc nck 90
Next Stories
1 दहा मुलांच्या आईला 25 वर्षानंतर ट्रिपल तलाक
2 फाळणीच्या ७२ वर्षांनंतर पाकिस्तानने उघडले “या” ऐतिहासिक गुरूद्वाराचे दरवाजे
3 पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसह दिसला मसूद अझहरचा भाऊ
Just Now!
X