केरळ प्रदेश काँग्रेसकडून अहवाल प्राप्त न झाल्याने काँग्रेसच्या शिस्तभंग कृती समितीने माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्याविरुद्ध अद्याप कारवाई केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचे निमंत्रण स्वीकारून थरूर यांनी मोदी यांची स्तुती केल्याने प्रदेश काँग्रेसने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
थरूर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रथम काँग्रेसच्या त्रिसदस्यीय शिस्तभंग समितीला निर्णय घ्यावा लागेल. अद्याप आमच्याकडे कोणाकडूनही कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर  योग्य निर्णय घेतला जाईल, असे मोतीलाल व्होरा यांनी सांगितले.