News Flash

गौरी लंकेश हत्याकांड : आरोपी नवीनकुमारला ५ दिवसांची एसआयटी कोठडी

आरोपी बंगळूरुतील हिंदू युवा सेना संघटनेचा अध्यक्ष

gauri lankesh
गौरी लंकेश (संग्रहित छायाचित्र)

बंगळूरु येथील ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेविका गौरी लंकेश हत्याप्रकरणातील अटकेत असलेला आरोपी के. टी. नवीनकुमार याला कोर्टाने ५ दिवसांची विशेष तपास पथकाची (एसआयटी) कोठडी सुनावली आहे. बंगळूरूच्या सत्र न्यायालयाने शुक्रवारी हे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास करणारी एसआयटी अनेक दिवसांपासून गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात नवीनकुमार याच्या चौकशीसाठी कोठडीची मागणी करीत होती.


१८ फेब्रुवारी रोजी कर्नाटक पोलिसांच्या गुन्हे अन्वेशन शाखेच्या संघटित गुन्हेगारी विंगच्या पथकाने केटी नवीनकुमार याला बंगळूरूच्या मॅजेस्टिक बस स्थानकाजवळ काही जिवंत काडतुसे आणि ०.३२ बोअरचे पिस्तूल विकताना रंगेहाथ अटक केली होती.

मात्र, लंकेश यांच्या हत्याप्रकरणात नवीकुमार याचा हात असल्याचे काही प्रथमदर्शनी पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी ते कोर्टात सादर करीत आरोपीच्या कोठडीची मागणी केली होती. ही मागणी कोर्टाने मान्य केली होती. त्यामुळे पोलिसांनी २ मार्च रोजी लंकेश ह्त्या प्रकरणात केलेली ही पहिली अटक होती. आरोपी नवीनकुमार हा बंगळूरुतील ‘हिंदू युवा सेना’ या संघटनेचा अध्यक्ष असल्याची माहितीही पोलिसांच्या चौकशीदरम्यान समोर आली आहे. गौरी लंकेश यांची सप्टेंबर २०१७ मध्ये हत्या झाली होती. यानंतर ५ महिन्यांनी ही पहिली अटक करण्यात पोलिसांना यश आले.

लोकप्रिय कन्नड साप्ताहिक लंकेश पत्रिकाच्या गौरी लंकेश (वय ५५) या संपादिका होत्या. १० सप्टेंबरच्या रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरात घुसून गोळ्या घालून त्यांची हत्या केली होती. लंकेश यांच्या हत्येनंतर सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. तसेच हल्लेखोरांची कोणाला माहिती असल्यास ती देण्याचे आवाहन जनतेला केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2018 5:55 pm

Web Title: kt naveen kumar an accused in gauri lankesh murder case granted sit custody for 5 days by bengaluru magistrate court
Next Stories
1 हेल्मेट घातले नव्हते म्हणून पळ काढला आणि बायकोचा जीवच गमावून बसला
2 त्रिपुरात दिवाळीसारखेच वातावरण-पंतप्रधान नरेंद्र मोदी
3 काश्मीरी पंडित काश्मीरचा अविभाज्य भाग, राज्य त्यांच्याशिवाय अपूर्ण : फारुख अब्दुल्ला