05 March 2021

News Flash

१० खून करुन पाप धुण्यासाठी कुंभमेळा गाठला, आणि…

माणसांनी काही पाप केले असेल तर कुंभमेळ्यामध्ये आंघोळ केली तर आपले पाप धुतले जाते

माणसांनी काही पाप केले असेल तर कुंभमेळ्यामध्ये आंघोळ केली तर आपले पाप हे धुतले जाते, अशी सर्वसामांन्यांची समजुत आहे. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये १० खून करुन पाप धुण्यासाठी एक आरोपी आला होता. त्या सिरियल किलरला स्नान करण्यापूर्वीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दहा जणांचा खून केल्याचे पोलिसांच्या चौकशीत त्याने कबूल केले आहे.

कलुआ उर्फ साई बाबा उर्फ सुभाष असे त्या सिरीयल किलरचे नाव असून तो प्रयागराज जिल्ह्यातील बसेहारा गावचा रहिवासी आहे. ३८ वर्षीय कलुआ हा माथेफिरू असून त्याने रस्त्यावर झोपलेल्या अनेकांवर चाकूने हल्ले केले आहेत. त्यातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. कलुआचे हे प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. पोलिसांनी कलुआवर ५० हजार रुपयांचे बक्षिस देखील ठेवले होते. नुकतीच कलुआने कुंभमेळ्या जवळच एका व्यक्तिची हत्या केली होती.

गेल्या काही दिवसांपासून आम्ही कलुआचा शोध घेत होतो. ‘ऑपरेशन सिरियल किलर’ या नावाने आम्ही त्याची शोध मोहिम सुरू केली होती. त्याच्यावर ५० हजार रूपयांचे बक्षीसही ठेवलं होते. शुक्रवारी कुंभमेळ्यामध्ये नियमीत तपासणी सुरू होती. त्यावेळी एका व्यक्तीच्या हातात कुऱ्हाड आणि धारधार शस्त्र दिसले. त्यावेळी त्याच्याकडे विचारपूस केली असता गेल्या सहा महिन्यात १० जणांना मारल्याची कबुली त्याने दिली. तसेच आपण इथं पाप धुण्यासाठी आल्याचे सांगितले, अशी माहिती एसएसपी नितिन तिवारी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 6:03 pm

Web Title: kumbh mela 2019 helps police nab serial killer wanted in 10 murder cases in prayagraj accused had come to wash off sins in river ganga
Next Stories
1 चहावाल्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास
2 हनुमानाची जात काढून भाजतायत राजकीय पोळी – अजित पवार
3 राम मंदिर उभारणीत केवळ काँग्रेसचाच अडथळा : प्रकाश जावडेकर
Just Now!
X