News Flash

लालूप्रसाद यादव यांची जामिनावर सुटका

लालूप्रसाद यांच्या वकिलांनी रांचीतील सीबीआय न्यायालयात प्रत्येकी १ लाख रुपयांच्या दोन हमी सादर केल्या.

(संग्रहित छायाचित्र)

रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयातील जामिनाबाबतची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर राजदचे अध्यक्ष लालू्प्रसाद यादव यांची गुरुवारी सायंकाळी कारागृहातून सुटका करण्यात आली. तथापि, ते आणखी काही उपचारांसाठी अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) थांबणार आहेत.

लालूप्रसाद यांच्या वकिलांनी रांचीतील सीबीआय न्यायालयात प्रत्येकी १ लाख रुपयांच्या दोन हमी सादर केल्या. यानंतर न्यायाधीश एम.के. मिश्रा यांनी यादव यांच्या सुटकेचा आदेश जारी केला. जामिनाच्या अटींचे पालन केल्यानंतर हा आदेश बिरसा मुंडा कारागृहात पोहचला. सध्या न्यायालयीन कोठडीत एम्समध्ये उपचार घेत असलेले लालूप्रसाद यांची यानंतर सायंकाळी सुटका करण्यात आली. लालूप्रसाद यांच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार ते व्याधींवरील उपचारांसाठी आणखी काही काळ एम्समध्ये थांबणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:59 am

Web Title: lalu prasad yadav released on bail abn 97
Next Stories
1 देशात लसटंचाई नाही!
2 सत्ताधाऱ्यांकडेच कल
3 महाराष्ट्राला मागणीपेक्षा जास्त प्राणवायू, दिल्लीला कमी का?
Just Now!
X