News Flash

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा बदलता येणार नाही

जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष कायदेशीर व घटनात्मक दर्जा बदलता येणार नाही व त्याला आव्हान देता येणार नाही, असा ऐतिहासिक निकाल जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिला आहे.

| July 19, 2015 08:30 am

जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष कायदेशीर व घटनात्मक दर्जा बदलता येणार नाही व त्याला आव्हान देता येणार नाही, असा ऐतिहासिक निकाल जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिला आहे.
न्यायालयाने सांगितले की, जम्मू-काश्मीर राज्याचे सार्वभौमत्व हे महाराजांच्या राजवटीपासून आहे व हे संस्थान सामील करून घेतल्यानंतरही त्याची वेगळी राज्यघटना व तिचे कायदेशीर व घटनात्मक वैधत्व कायम आहे त्यात बदल करता येणार नाही.
न्या. एम.ए अत्तार व ए.एम मॅग्रे यानंी सांगितले की, देशाच्या संसदेने २००२ मध्ये लागू केलेला आर्थिक मालमत्ता फेररचना व अंमलबजावणी सुरक्षा हित कायदा काश्मीरला लागू करता येणार नाही.
राज्याने परवानगी दिली तरच केंद्र सरकार काश्मीरबाबत कायदे करू शकते. भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसारच केंद्राचे कायदे जम्मू-काश्मीरला लागू होत नाहीत. महाराजाचे संस्थान विलीन केले तरी त्याचे सार्वभौमत्व बाधित होत नाही, असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. काश्मीरची स्थिती वेगळी, एकत्वाची व खास स्थितीची आहे, त्यामुळे राज्यातील कायदे देशातील इतर राज्यांतील कायद्यांशी तुलना करण्यासारखे नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 8:30 am

Web Title: law can not be change in jammu
टॅग : Jammu,Law
Next Stories
1 इसिसच्या इराकमधील हल्ल्यात ११५ ठार
2 मोदी ‘पावसाळी वादळा’साठी सज्ज
3 चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करणारे हिंदूविरोधी!
Just Now!
X