चित्रपट परीनिरीक्षण मंडळावरील ९० टक्के सदस्य कमी शिकलेले राजकीय महत्त्वाकांक्षेने प्रेरित व असंवेदनाक्षम आहेत, असे वक्तव्य मंडळाच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांनी केल्याने  सदस्यांमध्ये खळबळ उडाली असून सॅमसन यांनी रविवारी दिलगिरी व्यक्त करीत आपले वक्तव्य मागे घेतले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मात्र या वक्तव्याची दखल घेत मंडळावरील सदस्यांची शैक्षणिक पात्रता तपासण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.