जम्मू काश्मीरमधील कठुआ या ठिकाणी एका आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणारी आणि सगळ्या देशाला हादरवणारी ही घटना ठरली यात काहीही शंका नाही. या प्रकरणातला मुख्य आरोपी सांजी राम याने आपण या प्रकरणात निष्पाप असल्याचे  सुप्रीम कोर्टापुढे सांगितले आहे. एवढेच नाही तर कठुआ प्रकरणातल्या पीडितेच्या आजोबांप्रमाणे मी आहे असे त्याने सांगितले. या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी म्हणजे यातले खरे दोषी पकडले जातील असेही त्याने म्हटले आहे.

कठुआ प्रकरणातील अल्पवीयन मुलीवर सात दिवस बलात्कार करण्यात आला. तिला गुंगीचे औषधही देण्यात आले होते. जानेवारी महिन्यातला हा प्रकार अत्यंत घृणास्पद आणि काळजाचा थरकाप उडवणारा होता. कठुआ, उन्नाव आणि सुरत या तिन्ही ठिकाणच्या बलात्काराच्या घटना उघडकीस आल्यानंतर त्याविरोधात देशभरात मोठा क्षोभ उसळला. ज्यानंतर केंद्राला १२ वर्षांपर्यंतच्या मुलीवर बलात्कार केल्यास मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यास भाग पाडले. आता या प्रकरणातला मुख्य आरोप मी निष्पाप असल्याचे म्हणतो आहे.

कोर्टात बोलत असताना या प्रकरणाल्या मुख्य आरोपीने म्हणजेच सांजी रामने मला या प्रकरणात गोवले गेले आहे असे म्हटले आहे. ज्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली ती मला माझ्या नातीसारखी होती. तिच्यासोबत मी दुष्कृत्य कसे करेन? पोलिसांनी माझ्यावर गुन्हा नोंदवताना पक्षपातीपणा केला आहे असेही सांजी रामने म्हटले आहे.

कठुआ बलात्कार प्रकरणानंतर विविध सेलिब्रिटींनी या सगळ्या प्रकरणाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र निषेध केला होता. तर महिला आणि मुली सुरक्षित नाहीत असे म्हणत काँग्रेससह इतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीकेचे ताशेरे झाडले. आता या प्रकरणातला मुख्य आरोपी मी निष्पाप आहे असे सांगतो आहे. ‘एनडीटीव्ही’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.