Lok Sabha Election 2019 West Bengal Live : पश्चिम बंगालमध्ये खऱ्या अर्थाने निवडणूक गाजली होती. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा असून या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचा जोर होता. परंतु यावेळी झालेल्या हिंसाचारामुळे या निवडणुकीला वेगळीच कलाटणी मिळाली होती. त्यातच पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने आपल्या विशेषाधिकाराचा वापर करत प्रचारही 20 तास आधीच संपवण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी मात्र भाजपाने जोरदार मुसंडी मारत तृणमूल काँग्रेसला काँटे की टक्कर दिली.

 

Live Blog

लोकसभा निवडणूक 2019 चे सर्व लाईव्ह अपडेट इथे वाचा

17:00 (IST)23 May 2019
बाबुल सुप्रियो यांना निर्णायक आघाडी

केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांना निर्णयाक आघाडी मिळाली आहे. तब्बल 146632 मतांनी ते आघाडीवर आहेत. 

14:40 (IST)23 May 2019
पश्चिम बंगालमध्ये शाह'निती' यशस्वी

पश्चिम बंगालमध्ये भाजपाला इतिहासात पहिल्यांदाच मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. भाजपा सध्या 18 जागांवर आघाडीवर असून तृणमूल काँग्रेसला 24 जागांवर आघाडी मिळाल्याचे समोर आले आहे. भजापाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या चाणक्य नितीचा फायदा भाजपाला झाल्याचे दिसत आहे. 

13:55 (IST)23 May 2019
ममता बँनर्जींकडून विजेत्यांचे अभिनंदन

भाजपाला 17 जागांवर तर तृणमूल काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाला मोठी आघाडी मिळाली आहे. ममता बॅनर्जी यांनीदेखील ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच व्हिव्हिपॅटमधील मतपत्रिकांची मोजणी पूर्ण होऊ द्या असेही त्या म्हणाल्या.


13:09 (IST)23 May 2019
कोलकाता दक्षिण मतदारसंघातून चंद्र बोस पिछाडीवर

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे नातू आणि भाजपाचे उमेदवार चंद्र बोस कोलकाता दक्षिण मतदारसंघातून 44 हजार 627 मतांनी पिछाडीवर. तृणमूल काँग्रेसच्या माला रॉय यांनी घेतली आघाडी.

13:02 (IST)23 May 2019
प्रणव मुखर्जी यांचे पुत्र पिछाडीवर

जंगीपुर लोकसभा मतदारसंघातून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी पिछाडीवर आहेत. या मतदारसंघातून ते सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. तृणमूल काँग्रेसते खलीलुर रेहमान 89 हजार 624 मतांनी आघाडीवर आहेत.  तर भाजपाच्या उमेदवार मफूजा खातून दुसऱ्या स्थानावर आहेत.

12:38 (IST)23 May 2019
पहिल्या फेरीपासून बाबुल सुप्रियोंची आघाडी कायम

पहिल्याच फेरीपासून भाजपाचे विद्यमान खासदार बाबुल सुप्रियो यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आहे. त्यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.

12:23 (IST)23 May 2019
भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भाजपाला पश्चिम बंगालमध्ये मोठी आघाडी मिळाली आहे. त्यानंतर कोलकात्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जल्लोष केला.

12:13 (IST)23 May 2019
बाबुल सुप्रियो 46 हजार मतांनी आघाडीवर

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आसनसोल मतदारसंघातून 46,244 मतांनी आघाडीवर. तर बर्धमान-दुर्गापुर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री एस.एस.अहलुवालीया आणि तृणमूल काँग्रेसच्या मुमताज संघमिता यांच्यात सामना रंगला आहे. अहलुवालीया 10,549 मतांनी आघाडीवर.

11:23 (IST)23 May 2019
तृणमूलकडून मतदारांवर दबाव : रूपा गांगुली

तृणमूल काँग्रेसने हिंसाचाराचा अवलंब केला नसता, तर भाजपाने 30 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला असता. मतदानादरम्यान तृणमूलने मतदारांवर दबाव आणला नसता तर भाजपाने अधिक जागा जिंकल्या असत्या. ममता बॅनर्जींच्या कामकाजाला जनता कंटाळली आहे : भाजपा नेत्या रूपा गांगुली

11:05 (IST)23 May 2019
अभिषेक बॅनर्जी आघाडीवर

पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बर मतदारसंघातून आघाडीवर.

10:48 (IST)23 May 2019
भाजप तृणमूलमध्ये काँटे की टक्कर

पश्चिम बंगलामध्ये भाजपाने मोठी आघाडी घेतली असून भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. राज्यात तृणमूल काँग्रेस 20 जागांवर तर भाजपा 18 जागांवर आघाडीवर.

10:28 (IST)23 May 2019
तृणमूल 22 जागांवर आघाडीवर

तृणमूल काँग्रेस 22 जागांवर आघाडीवर, तर भाजपा 17 जागांवर आघाडीवर. गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपाला अधिक जागांवर विजय मिळण्याची शक्यता  

09:49 (IST)23 May 2019
भाजपा 15 ठिकाणी आघाडीवर

पश्चिम बंगालमध्ये भाजपा 15 ठिकाणी आघाडीवर

09:46 (IST)23 May 2019
बाबूल सुप्रियो 3 हजार मतांनी आघाडीवर

आसनसोल मतदारसंघातून बाबूल सुप्रियो 3448 मतांनी आघाडीवर

09:44 (IST)23 May 2019
अभिनेत्या नुसरत जहाँ आघाडीवर

बशीरहाट मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आणि अभिनेत्या नुसरत जहाॅ आघाडीवर

09:41 (IST)23 May 2019
बाबूल सुप्रियो आघाडीवर

आसनसोलमधून भाजपाचे विद्यमान खासदार बाबूल सुप्रियो आघाडीवर, तर तृणमूलच्या मून मून सेन पिछाडीवर

09:36 (IST)23 May 2019
गेल्या काही वर्षांतील निवडणुकीचे निकाल आणि विजेते

गेल्या वर्षांमधील निकाल

09:26 (IST)23 May 2019
सुरूवातीच्या कलात तृणमूल आघाडीवर

सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप सहा, काँग्रेस एक तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस 18 जागांवर आघाडीवर