News Flash

सर्व धर्माचा आदर राखा!

सर्व धर्माचा आदर राखला पाहिजे असे मत संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.

संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी

सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची सूचना
सर्व धर्माचा आदर राखला पाहिजे असे मत संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले. अहिंसेचे तत्त्व अमलात आणावे, अशी सूचना त्यांनी येथे सुरू असलेल्या धर्म-धम्म आंतरराष्ट्रीय परिषदेत केली.

आपल्या धर्मानुसार वागण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. विविध मार्गाने परमेश्वराची उपासना करता येते असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे सर्वधर्मसमभाव ठेवणे आपले कर्तव्य असून, त्यातूनच आपली प्रगती होईल असे जोशी यांनी स्पष्ट केले. हा आपला विचार जगाला दिल्याचे त्यांनी सांगितले. धर्म व पंथ याच्या अर्थाबाबत जगात संदिग्धता आहे. या दोन्ही संकल्पना वेगळ्या असून, धर्म आपल्याला कर्तव्य व हक्काची जाणीव करू देतो असे त्यांनी स्पष्ट केले. व्यक्ती जेव्हा धर्म व पंथामध्ये भेदभाव करतात त्या वेळी ते धर्म विसरतात. आपल्याला वाक्याने किंवा कृतीने एखाद्या व्यक्ती दुखावला जाऊ नये अशी सूचना त्यांनी केली. हिंदू ही संकल्पना एखाद्या पंथाशी निगडित आहे हा लोकांचा दृष्टिकोन बदलायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परस्पर विश्वास, सहकार्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली तर वाद नाहीसे होतील असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2015 2:54 am

Web Title: maintain respect for all religion says bhaiyyaji joshi
Next Stories
1 महिलांना हवाई दलात रणरागिणीचा बहुमान
2 पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, दोन नागरिक जखमी
3 इतकी टोकाची असहिष्णुता पूर्वी कधीच अनुभवली नव्हती ; गीतकार गुलजार यांची टीका;
Just Now!
X