घरातील सुनेवर बलात्कार करण्याच्या प्रयत्न केल्याबद्दल जयपूरमध्ये सासऱयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेताहेत. जयपूर शहरातील संगानेर भागात ही घटना घडली.
आनंदी लाल (वय ५०) असे आरोपी सासऱयाचे नाव आहे. गेल्या शनिवारी संध्याकाळी मुलगा कामानिमित्त घरातून बाहेर गेल्याचे पाहून त्याने सुनेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुनेने स्वतःचा बचाव करून तेथून पळ काढला. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना घडल्यापासून आनंदी लाल पळून गेला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 19, 2013 1:59 am