News Flash

पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवरुन बोलताना नवऱ्याने केली आत्महत्या

पत्नीसोबत लाईव्ह व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्य प्रदेशात इंदूरमधील एरोड्रम भागात रविवारी रात्री ही घटना घडली.

संग्रहित छायाचित्र.

पत्नीसोबत लाईव्ह व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्य प्रदेशात इंदूरमधील एरोड्रम भागात रविवारी रात्री ही घटना घडली. रणजीत (३२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कौटुंबिक वादामुळे पत्नी तिच्या माहेरी बिहारला निघून गेल्यामुळे रणजीत खचला होता.

रविवारी रात्री पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. रणजीत त्याच्या कुटुंबासोबत लक्ष्मणपूरा कॉलनीमध्ये रहायचा. पेशाने तो ड्रायव्हर होता. आत्महत्या करण्यापूर्वी रणजीतने त्याच्या पत्नीला व्हिडिओ कॉल केला होता.

पोलिसांनी हा मोबाइल फोन ताब्यात घेतला आहे. रणजीतची पत्नी आणि अन्य नातेवाईक मंगळवार दुपारपर्यंत इंदूरमध्ये दाखल होतील अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 3:07 pm

Web Title: man commit suicide while talking on video call with wife
Next Stories
1 बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती
2 आता मायक्रोव्हेव ओव्हनच घेणार तुमची ऑर्डर
3 विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, मुख्याधापक आणि शिक्षकांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; मुलगी गर्भवती
Just Now!
X