01 March 2021

News Flash

धक्कादायक! प्रेयसीने 2000 रुपये देण्यास दिला नकार, प्रियकराने फेकलं चेहऱ्यावर सॅनिटाइजर आणि…

दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते...

चंदिगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकराने चेहऱ्यावर सॅनिटाइजर टाकून जाळल्याची घटना घडली आहे. प्रेयसीने दोन हजार रुपये देण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने हे कृत्य केल्याचं समजतंय. पीडित तरुणीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर, पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, ६ आणि ७ जुलैच्या रात्री ही घटना घडली. तरुणी २० टक्के भाजली असून ती मूळची शिलाँगची आहे. नरेश नावाच्या आरोपीने तरुणीकडे २००० रुपये उसने मागितले होते. पण तिने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापातून त्याने तिच्यावर चेहऱ्यावर सॅनिटाइजर फेकले आणि आपल्याकडील लायटरने तिला पेटवले. नंतर शेजाऱ्यांनी पीडित मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. ही तरुणी डिसेंबरमध्ये पहिल्यांदा चंदिगडला आली, त्यानंतर नरेशसोबत तिची मैत्री झाली आणि दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते.

तो सतत पैशांची मागणी करायचा आणि पैशांवरुन मारहाण करायचा, अशी माहिती तरुणीने पोलिसांना दिली. दरम्यान, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर या प्रकरणी तरुणीने नरेशविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी कलम ३४२, ३२४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत नरेशला शनिवारी अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 10:32 am

Web Title: man held who throws sanitiser on girlfriends face burns her using lighter after she refuses to give him rs 2000 sas 89
Next Stories
1 Coronavirus: भारतात सलग दुसऱ्या दिवशी २८ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद, गेल्या २४ तासात ५०० जणांचा मृत्यू
2 अबब! ‘तो’ चक्क SBI ची खोटी शाखाच चालवत होता, खरे अधिकारी बँकेत पोहचले तेव्हा…
3 कर्फ्यू असतानाही रस्त्यावर फिरणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या मुलाला रोखलं, महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बदलीची कारवाई
Just Now!
X