News Flash

धक्कादायक! वर्दळीच्या रस्त्यावर सर्वांसमक्ष सुऱ्याने भोसकून हत्या

सर्वांसमक्ष एका व्यक्तीची सुऱ्याने भोसकून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे सर्वांसमोर हा प्रकार घडत असताना कोणीही आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला नाही.

धक्कादायक! वर्दळीच्या रस्त्यावर सर्वांसमक्ष सुऱ्याने भोसकून हत्या

जुन्या हैदराबाद शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर सर्वांसमक्ष एका व्यक्तीची सुऱ्याने भोसकून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे सर्वांसमोर हा प्रकार घडत असताना कोणीही आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट अनेकांनी या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. बुधवारी रात्री जुन्या हैदराबादच्या नयापूल भागात ही घटना घडली.

चंचलगुडा भागात रहाणाऱ्या ऑटोरिक्षा चालक अब्दुल खाजाने शकीर कुरेशीवर सुऱ्याने हल्ला केला. अब्दुलने खाटीक वापरतात त्या सुऱ्याने शकीरवर वार केले. शकीर कुरेशी सुद्धा रिक्षा चालक होता. शकीरच्या शरीराची हालचाल थांबल्यानंतर अब्दुल त्याच्या शेजारी बसून हा मरायलाच पाहिजे होता असे मोठमोठयाने ओरडत होता. एकूणच हा सर्व प्रकार धक्कादायक होता.

मीरचौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. कॉन्स्टेबलने कळवल्यामुळे १० मिनिटात आरोपीला अटक करण्यात आली असे हैदराबाद पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये काही पोलीस कॉन्स्टेबल तिथे उभे असल्याचे दिसत आहे पण कोणीही हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. एका वाहतूक पोलिसाने पाठिवर मारुन अब्दुल खाजाला अडवण्याचा प्रयत्न केला पण तो सुद्धा थांबवू शकला नाही.

खाजा दारुच्या नशेत होता व आधीपासूनच त्याचा शकीरवर राग होता असे पोलीस अधिकारी बी.आनंद यांनी सांगितले. अब्दुल खाजाने शकीर कुरेशीला त्याची ऑटोरिक्षा भाडयावर चालवण्यासाठी दिली होती. शकीरने ती रिक्षा दुसरा मित्र अकीलला चालवायला दिली. जेव्हा खाजाला याबद्दल समजले तेव्हा त्याने कुरेशीला जाब विचारला. दोघांमधील शाब्दीक बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले. अब्दुल खाजाने थेट सुऱ्याने वार करुन शकीर कुरेशीची हत्या केली. हैदराबादमधील दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. सप्टेंबरध्ये सुद्धा दिवसाढवळया एका व्यक्तीची अशा प्रकारे हत्या करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 1:19 pm

Web Title: man murdered in busy hyderabad street
Next Stories
1 Demonetisation: नोटाबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्का; मोदींचे माजी आर्थिक सल्लागार
2 दारुल उलुम देवबंद दहशतवाद्यांचा अड्डाच: गिरिराज सिंह
3 VIDEO: यशस्वी झेप! इस्त्रोने एकाचवेळी प्रक्षेपित केले ३१ उपग्रह
Just Now!
X