News Flash

प्रेमात नकार पचवता आला नाही, तरुणाने तरुणीची जाळली स्कूटर

ऑफिसमधील महिला सहकाऱ्याची स्कूटर जाळल्याप्रकरणी २६ वर्षीय तरुणाला आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.

ऑफिसमधील महिला सहकाऱ्याची स्कूटर जाळल्याप्रकरणी २६ वर्षीय तरुणाला आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरुच्या सी.व्ही.रामननगरमध्ये शनिवारी ही घटना घडली. स्कूटरच्या जवळ उभ्या असलेल्या आणखी तीन गाडयाही जळाल्या. केतन कुमार आणि त्याचा मित्र शिवा शंकरने तरुणीच्या घरासमोर उभी असलेली तिची स्कूटर जाळली.

आरोपी केतन आणि २६ वर्षीय तरुणी एका ऑटो कंपनीत नोकरी करतात. अलीकडेच केतनने या मुलीकडे आपले प्रेम व्यक्त करुन तिला मागणी घातली होती. पण तिने नकार दिला. केतनला हा नकार पचवता आला नाही. त्याच्या डोक्यात राग होता. शनिवारी केतनने शिवासोबत मद्य प्राशन केले व तरुणीच्या घराजवळ गेला.

रात्री पावणेतीनच्या सुमारास केतनने पेट्रोल ओतून तरुणीची स्कूटर पेटवून दिली व तिथून पळून गेला. आगीच्या ज्वाळांमध्ये तिथे उभ्या असलेल्या आणखी तीन दुचाकी जळाल्या. तरुणीने त्यानंतर आरोपी विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली. केतन आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 6:22 pm

Web Title: man sets ablaze womans scooter bengaluru rejecting proposal dmp 82
Next Stories
1 छत्तीसगड : सुकमात पाच नक्षलवाद्यांना अटक, शस्त्रसाठा जप्त
2 “राहुल गांधींनी पक्षातल्या वरिष्ठांची चर्चा करावी मग केंद्रावर आरोप करावेत”
3 भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणारी विद्यार्थीनी बेपत्ता
Just Now!
X