02 March 2021

News Flash

शिक्षेचा अघोरी प्रकार! पत्नीचा प्रियकर आणि त्याच्या बहिणींना झाडाला बांधून मारहाण

युवक विवाहित महिलेसोबत पळाला. त्याची शिक्षा म्हणून त्या युवकाला आणि त्याच्या दोन चुलत बहिणींना झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली.

युवक विवाहित महिलेसोबत पळाला. त्याची शिक्षा म्हणून त्या युवकाला आणि त्याच्या दोन चुलत बहिणींना झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. सर्वांसमक्ष अनेक तास हा निंदनीय प्रकार सुरु होता. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील अर्जुन कॉलनी परिसरात मंगळवारी ही घटना घडली.

हल्लेखोरांमध्ये महिलेचा पती सुद्धा होता. या तिघांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. मुलींचा विनयभंग करण्यात आला. युवक आणि महिलेला पळून जाण्यासाठी मदत केली म्हणून मुलींना मारहाण करण्यात आली. हे सर्व घडत असतान शंभरच्या आसपास लोक तिथे जमले होते. पण कोणीही त्यांची मदत करण्यासाठी पुढे आले नाही.

लोकांनी या घटनेचे व्हिडिओ बनवले. हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी नऊ जणांविरोधात एफआयआर दाखल केला असून त्यातील चार जण फरार आहेत. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असून त्यात तीन महिला आणि दोन पुरुष आहेत.

मुख्य आरोपी मुकेशची पत्नी काही दिवसांपूर्वी प्रियकरासोबत पळून गेली होती. दाही पोलीस स्टेशनमध्ये त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्याला पत्नीची माहिती मिळाली. त्याने पत्नीच्या प्रियकराशी संर्पक साधून तडजोडीसाठी अर्जुन कॉलनी येथे बोलावले. जेव्हा युवक त्याच्या बहिणींसोबत तिथे पोहोचला तेव्हा मुकेश आणि त्याच्या कुटुंबियांनी तिघांना झाडाला बांधून मारहाण केली. मुलींचा विनयभंग केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2019 1:17 pm

Web Title: man sisters are tied to tree molested beaten for hours
Next Stories
1 मुस्लीमविरोधी दंगली : श्रीलंकेच्या लष्कराचं सोशल आवाहन
2 सगोत्री विवाह करणाऱ्या तरुणावर मेहुण्याचा गोळीबार
3 १९५१ पासून ‘या’ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विजयाची पाटी कोरीच
Just Now!
X