‘जिगोलो’चे काम देतो सांगून, खोटया वेबसाइटद्वारे तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. सावज जाळयात आल्यानंतर तो त्यांना ऑनलाइन पेमेंट करायला लावायचा. खोटया वेबसाइटच्या माध्यमातून त्याने तब्बल २३ लाख रुपये कमावले.

आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून तो उत्तम नगरचा रहिवाशी आहे. आरोपी मूळचा बिहारचा खागरीयाचा आहे. जिगोलो म्हणजे देहविक्री किंवा पैशांच्या मोबदल्यात स्त्रियांना शरीरसुख देणारा पुरूष.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक

उत्तर नगरमध्येच राहणाऱ्या एका तरुणाने पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर हा सर्व घोटाळा उघड झाला. जिगोलो क्लबमध्ये दाखल होण्याच्या नावाखाली आपली ११ हजार रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा आरोप त्या तरुणाने केला. जिगोलो बनण्याची ऑफर देणाऱ्या त्या वेबसाइटची सर्व माहिती त्याने पोलिसांना दिली. तिथे पुरुषांना जिगोलो बनवण्यासाठी निमंत्रण दिले जायचे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

वेबसाइटवर दाखवलेल्या नंबरवर फोन केल्यांतर ऑनलाइन पेमेंट ट्रान्सफर करायला सांगण्यात आले. त्यानंतर जनकपुरीमध्ये भरती करणाऱ्या टीमला भेटायला जा, असा मेसेज दिला. रक्कम अदा केल्यानंतर त्याने पुन्हा फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण फोन लागतच नव्हता. जनकपुरी पोलीस ठाण्याच्या सायबर टीमने फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन घेतला असे डीसीपी दीपक पुरोहित यांनी सांगितले.