News Flash

‘फूल ऑफ जॉय विथ लिटल मॅक्स!’, झकरबर्गने शेअर केला लेकीसोबतचा फोटो

मार्कच्या डोळ्यांत कौतुक ओसंडून वाहत आहे, तर चिमुकली मॅक्ससुद्धा वडिलांकडे कुतूहलाने पाहत आहे.

मार्क आणि त्याची चिमुकली मॅक्स.

इंटरनेट महाजालातील सर्वात लोकप्रिय संवादाचे माध्यम असलेल्या फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झकरबर्गने आपल्या चिमुकलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘फूल ऑफ जॉय विथ लिटल मॅक्स’, असा मथळा देऊन मार्कने हा फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवर प्रसिद्ध केला आहे. एका सोफ्यावर पहुडलेला मार्क आपली चिमुकली मॅक्सची काळजी घेताना दिसतो. फोटोत दोघेही एकमेकांकडे पाहताना दिसतात. मार्कच्या डोळ्यांत कौतुक ओसंडून वाहत आहे, तर चिमुकली मॅक्ससुद्धा वडिलांकडे मोठ्या कुतूहलाने पाहत आहे.
मार्कच्या या फोटोवर लाईक्स आणि शेअरचा वर्षाव सुरू आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मार्कला कन्यारत्नाचा लाभ झाला. मार्कने आपल्या चिमुकलीला उद्देशून एक खास पत्र लिहून पिता झाल्याचा आनंद व्यक्त केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 11:18 am

Web Title: mark zuckerberg releases photo with baby maxima on facebook
टॅग : Mark Zuckerberg
Next Stories
1 पंतप्रधानांकडून सोनियांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, संसदेतील सहकार्यासाठी रणनिती
2 माहिती युगातील ज्ञान उपेक्षा
3 ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक
Just Now!
X