26 November 2020

News Flash

रेल्वेकडून प्रवाशांना ‘मसाज’ सेवा; आरामदायी प्रवासासाठी लवकरच नवी सुविधा

प्रवासादरम्यान कंटाळलेल्या प्रवाशांमधील शीण निघून जावा आणि त्यांच्यामध्ये स्फुर्ती निर्माण व्हावी यासाठी भारतीय रेल्वेकडून मसाजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रवासादरम्यान कंटाळलेल्या प्रवाशांमधील शीण निघून जावा आणि त्यांच्यामध्ये स्फुर्ती निर्माण व्हावी यासाठी भारतीय रेल्वेकडून मसाजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची सेवा दिली जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या रतलाम मंडळाने हा प्रस्ताव तयार केला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला इंदूरवरुन सुटणाऱ्या ३९ रेल्वे गाड्यांमध्येच उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

रेल्वेच्या माहितीनुसार, रतलाम मंडळाच्या इंदूर स्टेशनवरुन सुटणाऱ्या ३९ रेल्वे गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. प्रत्येक गाडीत तीन ते पाच प्रशिक्षित मसाज करणाऱ्या व्यक्तींना नियुक्त केले जाईल. मसाज करणाऱ्या या व्यक्ती प्रवाशांच्या सीटवर जाऊन सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच्या वेळेत त्यांना सेवा देतील.

या सुविधेसाठी प्रवाशांना १०० रुपयांपासून ३०० रुपयांचपर्यंत खर्च येऊ शकतो. कारण, मसाजसाठी रेल्वेने गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम ही तीन पॅकेजेस दिली आहेत. गोल्ड सेवेत १५ ते २० मिनिटांसाठी जैतून तेलाने (कमी तेलकट) मसाज केला जाईल. तर डायमंड आणि प्लॅटिनम सेवेत तेलासोबत क्रीम लावून मसाज केला जाणार आहे. मालवा एक्स्प्रेस, नवी दिल्ली इंटरसिटी एक्स्प्रेस, अहिल्यानगरी एक्स्प्रेस, अवांतिका एक्स्प्रेस, क्षिप्रा एक्स्प्रेस, नर्मदा एक्स्प्रेस, पेंचवली एक्स्प्रेस आणि उज्जयनी एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये ही सुविधा देण्यात येणार आहे.

येत्या २० दिवसांमध्ये या विशेष सेवेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर तो देशातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर लागू करण्यात येईल. या सेवेतून रेल्वेला सुमारे २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी आशा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2019 9:09 pm

Web Title: massage service to passengers by train for commuters comfortable journey aau 85
Next Stories
1 समलिंगी तरूणींना विकृत तरूणांकडून बसमध्ये मारहाण
2 आश्चर्य! ५६ टनांचा पूल एका रात्रीत अचानक गायब
3 अन् आमदरानं भररस्त्यात इंजिनिअरला काढायला लावल्या उठाबशा
Just Now!
X