22 January 2021

News Flash

बसप खासदाराला ‘नमो’स्तुती भोवली, पक्षातून हकालपट्टी

बहुजन समाज पक्षाचे उत्तरप्रदेश, हामीरपूर मतदारसंघाचे खासदार विजयबहाद्दूर सिंह यांना भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांची स्तुती चांगलीच महागात पडली.

| July 17, 2013 02:52 am

बहुजन समाज पक्षाचे उत्तरप्रदेश, हामीरपूर मतदारसंघाचे खासदार विजयबहाद्दूर सिंह यांना भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांची स्तुती चांगलीच महागात पडली. बसपा अध्यक्षा मायावती यांनी विजयबहाद्दूर सिंह यांना घरचा रस्ता दाखवत पक्षामधून त्यांची हकालपट्टी केली. पक्षाच्या ‘विचारांच्या व तत्वांच्या विरोधात जाऊन सिंह यांनी वेळोवेळी सूचना देऊनदेखील सातत्याने पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्याचा आरोप ‘बसप’कडून सिंग यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
गेल्या शनिवारी नरेंद्र मोदीं यांनी २००२च्या गुजरात दंगलीबद्दल केलेल्या वक्तव्याची पाठराखण करीत सिंह यांनी मोदी ‘अत्यंत संवेदनशील’ व्यक्तिमत्व असल्याचे व त्याच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे म्हटले होते.
“मोदींचे विचार शंभर टक्के बरोबर असून, ते देशाच्या भल्यासाठीच आहेत, त्यांच्या विचारांना विरोध करणारेच राष्ट्रद्रोही आहेत”, असे विजयबहाद्दूर सिंह म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2013 2:52 am

Web Title: mayawati expels mp who praised narendra modis puppy remarks
Next Stories
1 बिहारमध्ये माध्यान्ह भोजनातून विषबाधा; मृतांची संख्या २२वर
2 परकीय गुंतवणुकीला मुक्त संचार!
3 अ‍ॅसिड, अन्य विषारी वस्तूंच्या विक्रीवर नियंत्रणे
Just Now!
X