News Flash

पीडीपी फोडण्याचा प्रयत्न केला तर दहशतवादी जन्माला येतील – मेहबुबा मुफ्ती

जम्मू काश्मीरमध्ये भाजपाच्या पाठिंब्याने सत्तेत असलेलं सरकार पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासमोर पक्षाला एकजूट ठेवण्याचं आव्हान आहे

जम्मू काश्मीरमध्ये भाजपाच्या पाठिंब्याने सत्तेत असलेलं सरकार पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासमोर पक्षाला एकजूट ठेवण्याचं आव्हान आहे. पीडीपीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात असून, मेहबुबा मुफ्तींनी अशा नेत्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. शुक्रवारी मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपा आणि केंद्र सरकारला चेतावणी देत आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं म्हटलं आहे. हे सांगताना त्यांनी सलाऊद्दीन आणि यासीन मलिक या दहशतवाद्यांचाही उल्लेख केला.

<blockquote class=”twitter-tweet” data-lang=”en”><p lang=”hi” dir=”ltr”><a href=”https://twitter.com/hashtag/WATCH?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw”>#WATCH</a>: Former J&amp;K CM M Mufti says&#39;Agar Dilli ne 1987 ki tarah yahan ki awam ke vote pe daaka dala, agar iss kism ki tod fod ki koshish ki,jis tarah ek Salahuddin ek Yasin Malik ne janm liya…agar Dilliwalon ne PDP ko todne ki koshish ki uski nataish bahut zyada khatarnaak hogi&#39; <a href=”https://t.co/LmC7V4OwN2″>pic.twitter.com/LmC7V4OwN2</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href=”https://twitter.com/ANI/status/1017619393637953542?ref_src=twsrc%5Etfw”>July 13, 2018</a></blockquote>
<script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपा आणि केंद्र सरकारला १९८७ ची आठवण करुन देत इशारा दिला आहे. मेहबुबा मुफ्ती बोलल्या आहेत की, ‘जर दिल्लीने १९८७ प्रमाणे लोकांच्या मतदान हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केला, लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती फार गंभीर होईल’. पुढे त्या म्हणाल्या की, ‘त्यावेळी जेव्हा एक सलाऊद्दीन आणि यासीन मलिक जन्माला आले होते, यावेळी परिस्थिती अजून चिघळेल’. दरम्यान जम्मू काश्मीरमधील भाजपा नेते रवींद्र रैना यांनी हे वक्तव्य आपत्तीजनक असल्याचं म्हटलं आहे. भाजपा कोणतीही फूट पाडण्याचं किंवा पक्ष फोडण्याचं काम करत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

याआधी गुरुवारी मेहबुबा मुफ्ती यांनी बंडखोर नेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पीडीपीचे विधान परिषद सदस्य यासिर रेशी यांना बंदीपोरा जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. यासिर रेशी यांनी सार्वजनिकपणे मेहबुबा मुफ्ती यांच्यावर टीका केली होती. पीडीपीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वाढली असून त्यामुळेच मेहबुबा मुफ्ती चिंताग्रस्त आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 11:41 am

Web Title: mehbooba mufti says consequences will be dangerous if bjp tries to break pdp
Next Stories
1 ‘मी मुशर्ऱफसारखा भित्रा नाही’, नवाज शरिफ आणि मरियम यांना आज अटक
2 नवाज शरिफ यांच्या नातवंडांना लंडन पोलिसांनी घेतलं ताब्यात
3 धक्कादायक ! पक्ष्याचं अंड फोडलं म्हणून पाच वर्षाच्या मुलीला नाकारला घरात प्रवेश
Just Now!
X