25 September 2020

News Flash

मिशेल यांचे ड्रेस डिझायनर अनिवासी भारतीय मोहपात्रा

अमेरिकेच्या प्रथम महिला व अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचा पोशाख बिभू मोहपात्रा यांनी तयार केलेला होता त्या आपल्या पतीसमवेत तीन दिवसांच्या भारत

| January 26, 2015 12:57 pm

अमेरिकेच्या प्रथम महिला व अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचा पोशाख बिभू मोहपात्रा यांनी तयार केलेला होता त्या आपल्या पतीसमवेत तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या आहेत.  
  एअर फोर्स वन विमानाने त्यांचे आगमन झाले तेव्हा त्यांचा गुडघ्यापर्यंत रूळणारा पोशाख साजेसा दिसत होता. मूळ ओडिशातील रूरकेलाचे मोहपात्रा आता न्यूयॉर्कमध्ये असतात ते मिशेल यांचे ड्रेस डिझायनर आहेत. त्यांनी ट्विटरवर या बातमीला दुजोरा दिला आहे.
  मिशेल यांनी मोहपात्रा यांनी तयार केलेला पोशाख यापूर्वी टुनाइट शो विथ जे लेनो या २०१२ मधील कार्यक्रमात परिधान केला होता.

ओबामांसाठी शाही खाना
बराक ओबामा यांच्यासाठी शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही पदार्थाचा समावेश मेन्यूत करण्यात आला होता. जम्मू-काश्मीरचे नद्रू के गुलार ते पश्चिम बंगालचे माही सरसो हे पदार्थ त्यांना दुपारच्या जेवणात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सन्मानार्थ शाही भोजन ठेवले होते. हैदराबाद हाऊस येथे दोन वेगवेगळ्या प्रकारचे मेन्यू होते.सूपमध्ये शतवार (शतावरी-अ‍ॅस्परागस) का शोरबा या सूपचा समावेश होता, गोड पदार्थात गुलाब जाम व गाजर का हलवा व फळांचा समावेश होता. अननस और पनीर का सूला, चार ग्रील्ड र कॉटेज चीज व अननस, नद्रू के गुलार (कमळाच्या देठाचे कबाब), केला मेथी नू शाक (गुजराती पदार्थ), कलोंजी ही मिश्र भाजी व गुजराथी कढी, मटार पुलाव यांचाही समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2015 12:57 pm

Web Title: michelle obama wearing indian designer bibhu mohapatras dress
Next Stories
1 बनारसी साडीचा मिशेलना नजराणा
2 ‘इसिस’कडून दोनपैकी एका जपानी ओलिसाची हत्या
3 शह आणि मात!
Just Now!
X