News Flash

‘मी कोब्रा आहे’ असं म्हणणाऱ्या मिथुन चक्रवर्तींचे नाव भाजपाच्या अंतिम यादीत नाही

पश्चिम बंगालमधील मतदान आठ टप्प्यात पार पडणार आहे

(संग्रहित छायाचित्र)

पश्चिम बंगाल भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची अंतिम यादी आज जाहीर केली. यात १३ नावे आहेत परंतु मिथुन चक्रवर्ती यांचे नाव नाही. राश्बेहारी ही जागा बंगाली सिनेमाचे दादा मिथुन चक्रवर्तींसाठी राखीव ठेवण्यात येईल असे बऱ्याच लोकांना वाटत होते. पक्षाने या जागेवरून कश्मीर येथे निर्णायक भूमिका निभावणारे लेफ्टनंट जनरल सुब्रत साहा यांना उमेदवारी दिली आहे. दक्षिण कोलकातामधील ही प्रतिष्ठित जागा चक्रवर्ती यांच्यासाठी ठेवण्यात येत असल्याचे भाजपच्या सूत्रांनी आधी सांगितले होते.

७मार्च रोजी कोलकाता येथे झालेल्या भाजपाच्या ब्रिगेड परेड ग्राऊंड मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी प्रमुख भाजपात प्रवेश केला होता.

त्याच ठिकाणी अभिनेत्याने बंगाली चित्रपट आमदार फटाकेश्टो मधील आपली लोकप्रिय ओळ म्हटली होती: “मी तुला येथे मारले तर तुझे शरीर स्मशानभूमीत जाईल.” त्या दिवशी त्यांनी निवडणूकीसाठी नवीन लाईन देखील दिली: “मी निरुपद्रवी पाण्याचा साप किंवा निरुपद्रवी वाळवंटातील साप नाही. मी एक कोब्रा आहे. एकाच दंशाने मी तुला संपवून टाकेन.”

‘मी कोब्रा’ असं म्हणणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांच्या सुरक्षेत वाढ; केंद्राने दिले ‘वाय प्लस’ संरक्षण

मुख्य म्हणजे अलीकडच्या आठवड्यात त्यांनी मुंबईतून आपले मतदान कार्डात बदल करून कोलकाता येथून मतदार म्हणून नावनोंदणी केली होती. तथापि या क्षणी तरी निवडणूक लढविण्याच्या त्यांची इच्छा ही इच्छाच राहताना दिसत आहे. परंतु एखाद्या उमेदवाराच्या जागी कदाचित ते निवडणुकीच्या मैदानात उतरतील देखील. बंगालमधील मतदान आठ टप्प्यात पार पडणार असून अंतिम टप्प्यासाठी उमेदवारी दाखल करण्यची अंतिम तारीख एप्रिलच्या मध्यापर्यंत आहे.

त्यांच्या चाहत्यांसाठी म्हणून श्री चक्रवर्ती ३० मार्च रोजी सुवेन्दु अधिकारी यांच्यासाठी नंदीग्राममध्ये प्रचार करणार आहेत. त्या रोड शोमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2021 2:38 pm

Web Title: mithun chakraborty name missing from final list of bjp for bengal election sbi 84
Next Stories
1 “उद्धव ठाकरेंच्या मनात ही भीती की देशमुखांवर कारवाई केली, तर ते…”
2 “मी या App विरोधात कायदेशीर कारवाई करणार”; शशी थरूर संतापले
3 आमिर खानच्या शोमध्ये आयपीएस अधिकाऱ्याने मुंबईतील वसुली यंत्रणेबद्दल दिली कबुली; व्हिडिओ व्हायरल
Just Now!
X