राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये फूट पडल्याचा फायदा कॉंग्रेस पक्षालाच होईल, अशी आशा मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आणि खासदार सज्जन सिंग वर्मा यांनी व्यक्त केलीये. संयुक्त जनता दलाने रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. गेल्या १७ वर्षांपासूनची युती रविवारी संपुष्टात आली. या घडामोडीमुळे राष्ट्रीय राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला याचा फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
नरेंद्र मोदी यांची भाजपच्या प्रचारप्रमुखपदी निवड झाल्यामुळे त्यांच्याच पक्षातील सुषमा स्वराज यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते नाराज आहेत. मोदी यांची निवड त्यांना अजिबात आवडलेली नाही. त्यामुळे मोदीच्या मुद्द्याचा कॉंग्रेसला दिर्घकालीन फायदा होईल, असे वर्मा यांनी म्हटले आहे.