मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज मोदी या आडनावाला अर्थ उलगडून सांगितला आहे. ते म्हणतात MODI हे आडनाव म्हणजे एक मंत्र आहे. M म्हणजे Motivational, त्यांनी आत्तापर्यंत पंतप्रधान म्हणून केलेलं काम हे प्रेरणादायी आहे. O म्हणजे Opportunity, D म्हणजे Dynamic Leadership आणि I म्हणजे Inspire India, आत्तापर्यंत त्यांनी जे काम पंतप्रधान म्हणून केलं आहे ते आदर्शवत आहे असंही चौहान यांनी स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या इनिंगच्या कार्यकाळाला आज वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर सगळ्याच भाजपा नेत्यांकडून स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. आज शिवराजसिंग चौहान यांनीही मोदींचं कौतुक केलं आहे. मोदींच्या नावाची व्याख्याच त्यांनी उलगडून सांगितली आहे.