फोर्ब्स नियतकालिकाने २०१५च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नववे स्थान दिले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या या यादीत अर्थातच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन पहिल्या क्रमांकावर आहेत. २०१४ मध्ये मोदी चौदाव्या क्रमांकावर होते. जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल या दुसऱ्या क्रमांकावर असून अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा तिसऱ्या, तर पोप फ्रान्सिस चौथ्या क्रमांकावर आहेत. चीनचे अध्यक्ष क्षी जीनपिंग यांचा पाचवा क्रमांक लागला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Nov 2015 रोजी प्रकाशित
जगातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांत मोदी नववे
चीनचे अध्यक्ष क्षी जीनपिंग यांचा पाचवा क्रमांक लागला आहे.
Written by रत्नाकर पवार

First published on: 05-11-2015 at 05:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi rank ninth in influential personalities in the world