News Flash

इयर एण्डला मोदींचा अमेरिका दौरा?; पहिल्यांदाच बायडन यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून भेट घेण्याची शक्यता

जी सेव्हन राष्ट्रांच्या बैठकीला मोदी उपस्थित राहणार नसल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं असून मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता मात्र व्यक्त करण्यात येतेय

पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता. ( फाइल फोटो, फोटो सौजन्य: पीएम इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन वरुन साभार)

पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षीच्या शेवटला अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता आहे. मोदी अमेरिकेची राजधानी असणाऱ्या वॉशिंग्टन डी. सी.मध्ये पहिल्यांदाच अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत आणि अमेरिकेतील परिस्थिती करोनामुळे बिघडली नाही तर मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची दाट शक्यता आहे. भारत तसेच आमेरिकेतील अधिकारी या भेटीच्या नियोजनासंदर्भात चर्चा करत असल्याचे वृत्त डेक्कन हेराल्डने दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान जाणार असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बायडन यांच्यादरम्यान आतापर्यंत दोनदा फोनवरुन चर्चा झालीय. मागील काही महिन्यांमध्ये मोदी आणि बायडन यांनी दोन वेळा वेगवेगळ्या बैठकींमध्ये व्हर्चूअल माध्यमातून सहभाग नोंदवला आहे. मात्र मोदींनी अमेरिकाचा दौरा केला तर देशाचे प्रमुख म्हणून दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच बैठक असेल. अमेरिकेत सत्तापालट झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच दौर ठरेल.

नक्की वाचा >> व्हाइट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. फौचींचे ईमेल्स लीक; समोर आलं चीन कनेक्शन

दिल्लीमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बायडन प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना वॉशिंग्टन डिसीमध्ये आमंत्रित करण्याची योजना दिल्लीला कळवली आहे. या वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये हा दौरा आखण्यात येण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूकडून यासंदर्भात चर्चा झालीय. मात्र दोन्ही देशांमधील करोना परिस्थिती कशी असेल यावर हा दौऱ्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. दोन्ही देशांमधील करोना परिस्थिती फार गंभीर नसेल तरच दौऱ्याबद्दल पुढील विचार केला जाईल असं दिल्लीतील सुत्रांनी सांगितलं आहे.

मोदी आणि बायडन यांची या दौऱ्यानिमित्त पहिल्यांदाच प्रत्यक्षात राष्ट्रांचे प्रमुख म्हणून भेट होईल. मात्र त्याचप्रमाणे क्वाड देशांचे प्रमुखही या दौऱ्यादरम्यान एकत्र येऊ शकता. बायडन यांनी क्वाड देशांच्या प्रमुखांची बैठक घेण्यासंदर्भातील हलचाली सुरु केल्याचे वृत्त आहे. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनाही बायडन यांच्याकडून याच कालावधीमध्ये अमेरिकेच्या भेटीचं आमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा >> अमेरिकेत TikTok वरील बंदी उठली; मोदी सरकारही बायडन यांच्या पावलावर पाऊल टाकणार?

व्हाइट हाऊसचे भारत-प्रशांत विभाग धोरण सल्लागार कुर्त कॅम्पबेल यांनी यासंदर्भात माहिती देताना, “क्वाड देशांच्या प्रमुखांची प्रत्यक्षात बैठक घेण्याची आमचा महत्वकांशी प्रयत्न आहे. ही बैठक वॉशिग्टनमध्ये घेण्याचा प्रयत्न असून सर्व नेते प्रत्यक्षात उपस्थित राहतील असा आमचा प्रय़त्न सुरुय,” असं कॅम्पबेल म्हणाले. अमेरिकन सुरक्षा परिषदेमध्ये भारत प्रशांत महासागरातील सुरक्षेसंदर्भात बोलताना कॅम्पबेल यांनी ही माहिती दिलीय.

मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया, भारत, जपान व अमेरिका या देशांनी क्वाड गटाची पहिली व्हर्चूअल बैठक घेतली होती.  २००७ साली क्वाड देशांच्या समुहाची स्थापना झाली होती. त्यानंतर २०१७ पासून हा गट पुन्हा सक्रीय झालाय. चीनकडून होणाऱ्या आक्रमणांपासून लोकशाहीवादी देशांच्या संरक्षणासाठी आणि समान धोरणांसाठी या गटाची स्थापना करण्यात आलीय. भारत प्रशांत महासागर प्रदेशातील देशांमध्ये शांतता आणि सहकार्य टीकून राहण्यासाठी आणि चीनच्या अक्रमकतेला विरोध करण्यासाठी हा गट काम करतोय.

नक्की वाचा >> “ट्विटर East India Company सारखं वागू लागलंय, इथूनच पैसा कमावायचा आणि…”; VHP ने व्यक्त केला संताप

मोदी, बायडन, सुगा, मॉरिसन यांनी १२ मार्च रोजी ऑनलाइन माध्यमातून बैठक घेतली होती. अनेक मुद्द्यांवर या बैठकीमध्ये एकमत झालं आणि भविष्यातील विषयांवरही चर्चा झाली. जी सेव्हन गटातील राष्ट्रांची पुढील शुक्रवार ते रविवार अशी एक बैठक पार पडणार आहे. ब्रिटीश पंतप्रधान बॉरिस जॉन्सन यांच्या अध्यक्षेतेखाली साऊथ वेस्ट इंग्लंडमधील क्रॉनवेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलीय. मात्र देशातील करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी या बैठकीला हजर राहता येणार नाही असं सांगितलं आहे. असं असलं तरी बायडन, सुगा, मॉरिसन हे या बैठकीसाठी पुढील आठवड्यात ब्रिटनला जाणार आहेत.

नक्की वाचा >> राष्ट्रध्यक्षांचं Tweet Delete केल्याने ‘या’ देशाने ट्विटरवर घातली बंदी; निर्णयामुळे भारतीय कंपनीला ‘अच्छे दिन’?

भारत हा जी सेव्हन राष्ट्रांचा सभासद नाही. यामध्ये जपान, इटली, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटनचा समावेश आहे. मात्र जॉन्सन यांनी मोदींना विशेष आमंत्रित म्हणून या बैठकीचं आमंत्रण दिलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 11:43 am

Web Title: modi visit to us india pm may travel for first in person meeting with biden scsg 91
Next Stories
1 Coronavirus: देशात एका दिवसातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद, बाधितांच्या संख्येतही वाढ
2 अमेरिकेत TikTok वरील बंदी उठली; मोदी सरकारही बायडन यांच्या पावलावर पाऊल टाकणार?
3 Lockdown Impact: घर चालवण्यासाठी मुलगी झाली डिलीव्हरी बॉय
Just Now!
X