सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

शैक्षणिक धोरण सरकारकडून ठरवले जात असले तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शिक्षकच करतात असे म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी शिक्षकांच्या भूमिकेचा गौरव केला. येथील समारंभात शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात दिनानाथ बात्रा यांचा समावेश होता.

शिक्षकांचा देशाच्या विकासामध्ये मोठा वाटा आहे. सध्याच्या काळात शिक्षणावर मोठी चर्चा घडून येते. या सुधारणा घ्यायच्या की ही प्रणाली स्वीकारायची यावर मोठी चर्चा होताना दिसून येते. यातून किती चांगले बाहेर येते ते पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

ऐखादी योजना चांगली असेल आणि त्यासाठी निधी वितरित करण्यात आला असेल तरीही शिक्षकच ती योजना किती अमलात आणतात. शिक्षकांनी ‘शिक्षा’ (शिक्षण) आणि ‘विद्या’ (ज्ञान) यांच्यामध्ये समतोल आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.