केंद्रीय तेल व पेट्रोलियम मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी येत्या काही दिवसात पेट्रोलचे दरात कपात होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. दर कमी झाल्यास महागाईचे चटके सोसणाऱया जनतेला त्यातल्यात्यात दिलासा देणारी ही गोष्ट ठरेल.
डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण थांबल्यामुळे पेट्रोलचे कमी होण्याची शक्यता आहे. मोईली म्हणाले, “आंतराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलच्या दरात होणारा बदल आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण थांबल्याचा फायदा नक्कीच पेट्रोल ग्राहकांना होईल. यात काही शंका नाही. त्यामुळे ३० सप्टेंबरपूर्वी पेट्रोलच्या दर कमी होतील अशी आशा आहे.”