नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू असतानाच त्यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. मोदींच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील महिला पोलिसांचे पथक ठेवण्याचा निर्णय गुजरात पोलिसांनी घेतला आहे.
मोदी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. विशेषत: महिला दहशतवाद्यांचा धोका असल्याची माहिती मिळाल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मोदींच्या सभेत मोठय़ा प्रमाणात महिला असतात, त्यामुळे मोदींच्या सुरक्षेसाठी हे अतिरिक्त कडे निर्माण केले जाणार आहे. मोदींच्या सुरक्षा ताफ्यात सध्यात राष्ट्रीय सुरक्षा दल व गुजरात पोलिसांचे ४५ कमांडो आहेत. मात्र विशेषत: गुजरातमध्ये एखाद्या समारंभात अनेक जण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पुढे येतात अशा वेळी ही सुरक्षा गरजेची असल्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) एस.के. नंदा यांनी सांगितले. गुजराममध्ये मोदी जेथे कुठे कार्यक्रमाला जातील तेव्हा अशी सुरक्षा देण्याचे निर्देश गृहखात्याने यापूर्वीच दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.