News Flash

वर्षभरात एक लाख कोटी मुल्याच्या दोन हजाराच्या नोटा चलनातून ‘गायब’; RBI चा अहवाल

२०१९ ते २०२० या कालावधील दोन हजार रुपयांच्या ५६ कोटी नोटा चलनातून बाहेर

फाइल फोटो (फोटो सौजन्य : AFP)

मागील एका वर्षाच्या कालावधीमध्ये १.१ लाख कोटी मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनामधून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये दोन हजार रुयांच्या नोटांचे एकूण मुल्य ५.४ लाख कोटींपर्यंत कमी झाले आहे. २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या ६.५ लाख कोटी रुपये मुल्यांच्या नोटा चलनात होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १८ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे. दोन हजारच्या नोट्यांच्या उलट ५०० रुपयांच्या नोटा या ४ लाख कोटींनी वाढल्याचे दिसत आहे. २०१८-२९ मध्ये १०.७ लाख कोटींच्या ५०० च्या नोटा चलनात असताना २०१९-२० साली हे मूल्य १४.७ लाख कोटींपर्यंत पोहचले. २०१९-२० च्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली नव्हती असंही आरबीआयने स्पष्ट केलं आहे. तसेच बीएरबीएनएमपीएलने (भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड) आणि एसपीएमसीआयएलने (सिक्युरिटी प्रिटींग अॅण्ड मिटिंग कॉर्परेशन ऑफ इंडिया) कोणताही अतिरिक्त पुरवठा केलेला नाही असंही या अहवालात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> दोन हजाराच्या नोटांची छपाई बंद होणार?; अर्थमंत्रालय म्हणते…

मागील काही वर्षांमध्ये देशातील सर्वाधिक मूल्य असणारी चलनातील २००० रुपयांच्या नोटेचा वापर कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. २०१८ मध्ये ३३६ कोटी चलनात होता. तर २०१९ मध्ये हा आकडा साल कोटींनी कमी होऊन ३२९ वर आला. त्यानंतर २०२० साली हा आकडा कमालीचा कमी झाला आहे. २०१९ ते २०२० या कालावधील दोन हजार रुपयांच्या ५६ कोटी नोटा चलनातून बाहेर फेकल्या गेल्या आहेत. २०२० साली दोन हजारच्या २७३ कोटी नोटा चलनात आहेत असं आरबीआयचा वार्षिक अहवाल सांगतो. हा अहवाल मार्च २०२० पर्यंतचा आहे. दोन हजारच्या नोटांचे बाजारपेठेतील एकूण मुल्याची हिस्सेदारीही मागील दोन वर्षांमध्ये कमी झाली आहे. २०१८ मध्ये चलनातील ३७.३ टक्के नोटा दोन हजारांच्या होत्या. त्या आता म्हणजेच २०२० साली २२.६ टक्क्यांपर्यंत आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर दोन हजार आणि ५०० च्या नव्या नोटा चलनात आल्या होत्या. काळ्या पैश्यावर तसेच आर्थिक गैरव्यवहारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नोटबंदीची घोषणा करत असल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतरही आर्थिक गुन्हेगारी कमी झाल्याचे चित्र दिसत नाही.

२०१९ मध्ये दोन हजाराच्या १४ हजार ४९४ तर ५०० रुपयांच्या पाच हजार ५५८ बनावट नोटा गुजरातमधून सापडल्या. ही माहिती गृहमंत्रालयाचे राज्यमंत्री जी. कृष्णा रेड्डी यांनी लोकसभेमध्ये एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरादरम्यान दिली. २०१६-२०१९ कालावधीमध्ये गुजरातमधून दोन हजार रुपयांच्या ११. ४ कोटींच्या ५०० रुपयांच्या ७४.३८ लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. कोणत्याही राज्यामध्ये या कालावधीत जप्त करण्यात आलेल्या या सर्वाधिक बनावट नोटा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 1:33 pm

Web Title: more than rs 1 lakh crore worth of rs 2000 notes vanish in one year shows rbi data scsg 91
Next Stories
1 “कृषी विधेयकांवरुन मोदी सरकारविरोधात काँग्रेसने केलेलं आंदोलन म्हणजे लबाडी”
2 गोंधळी खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांचं आंदोलन
3 राहुल गांधी मोदी सरकारवर संतापले! आधी आवाज दाबला, आता निलंबित केलं
Just Now!
X