मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. मुस्लिम तरुणाला काढायला लावली टोपी, जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने मारहाण

गुरुग्राम येथे काही अज्ञात तरुणांनी २५ वर्षीय मुस्लिम तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने पारंपारिक टोपी घातली असल्याने ही मारहाण करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. वाचा सविस्तर..

२.‘रामराजे बिनलग्नाची औलाद’, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं वादग्रस्त वक्तव्य

सोलापुरातील माढा लोकसभा मतदारासंघातून विजयी झालेले भाजपाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार होताच वादग्रस्त वक्तव्य करत वाद निर्माण केला आहे. वाचा सविस्तर..

३. मणिशंकर अय्यर छाप पुढाऱ्यांना घेऊन चालवण्यापेक्षा काँग्रेस पक्ष बरखास्त केलेला बरा – उद्धव ठाकरे</strong>

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, पण पक्षाने तो स्वीकारला नाही. तो न स्वीकारणाऱयांना चेहरे नाहीत व मजबूत हात नाहीत हेच काँग्रेसचे खरे स्वरूप आहे. अशा पक्षाचे काय होणार, हा प्रश्नच आहे! असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून म्हटलं आहे. वाचा सविस्तर..

४.मोदींचा शपथविधी गुरुवारी संभाव्य मंत्र्यांची नावे गुलदस्त्यात 

लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व विजय मिळवून देणारे नरेंद्र मोदी ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. वाचा सविस्तर..

५.‘बिग बॉस मराठी २चं ग्रँड प्रिमिअर; या सेलिब्रिटींचा घरात प्रवेश

बिग बॉस मराठी २ च्या घरात कोण कोण असणार याची गेल्या काही दिवसांपासून लागलेली उत्सुकता आता संपली आहे. या कार्यक्रमाचा ग्रँड प्रिमिअर नुकताच पार पडला असून बिग बॉसच्या घरात कोणकोणते सेलिब्रिटी जाणार यावरून पडदा उचलण्यात आला आहे. वाचा सविस्तर..