मोदी सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार?, पराभवानंतर ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह पाच राज्यातील अपयशामुळे हादरलेल्या मोदी सरकारकडून शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी हे तब्बल ४ लाख कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. या कर्जमाफीचा २ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. वाचा सविस्तर

मध्य प्रदेशमध्ये ‘कमल’राज

मध्य प्रदेशात 15 वर्षांनंतर काँग्रेस पक्ष सरकार स्थापण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात जोरदार चूरस पाहायला मिळत आहेत. मात्र, मध्य प्रदेश काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून गुरूवारी याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी घोषणा करतील असं म्हटलं जात आहे. वाचा सविस्तर

WhatsApp ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यासाठी परवानगी अनिवार्य!

WhatsApp युजर्सना दिलासा देणारं वृत्त आहे. व्हॉटस अ‍ॅप ग्रुपमध्ये कोणालाही अ‍ॅड करायचे असल्यास त्या व्यक्तीची परवानगी असणे आता गरजेचे होणार आहे, जर तुमची परवानगी नसेल तर कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. तशी सूचना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) व्हॉट्स अॅपला केली आहे. कोणालाही अॅड करण्यासाठी त्याची परवानगी घेणारं फिचर आणावं अशी सूचना करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या निकालांचा विदर्भ, खान्देशात परिणाम

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयाने भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात फरक पडू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पाच राज्यांच्या निकालांनी काँग्रेस आणि शिवसेनेची कॉलर ताठ झाली असून, पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीकडून काँग्रेस हा भाजपला सक्षम पर्याय असल्याचे कौतुक करण्यात आले. वाचा सविस्तर

इनसाइट यानाची मंगळावरून पृथ्वीकडे ‘सेल्फी’

अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने मंगळावर पाठवलेल्या इनसाइट यानाने यांत्रिक बाहू व कॅमेरा यांच्या मदतीने सेल्फी छायाचित्र घेतले असून त्यात एकूण अकरा प्रतिमांचे ते संकलन आहे असे सांगण्यात आले. क्युरिऑसिटी रोव्हर मोहिमेतही याच पद्धतीने छायाचित्रे काढण्यात आली होती. नंतर ती एकत्र जुळवण्यात आली होती. या स्वप्रतिमेत (सेल्फी) लँडरचे सौर पंख व सगळी वैज्ञानिक उपकरणेही दिसत आहेत. वाचा सविस्तर