News Flash

मुलायम सिंह यादव पुन्हा रूग्णालयात दाखल

गाजियाबादमधील यशोदा रूग्णालयात उपचार सुरू

संग्रहीत

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टी प्रमुख मुलायम सिंह यादव यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाजियाबादमधील कौशांबी येथील यशोदा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मागिल काही दिवसांपासून त्यांची तब्येत सातत्याने खालवत आहे.

मुलायम सिंह यांना युरिनरी रिटेंशनच्या त्रासामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अगोदर १० जून रोजी त्यांना गुडगावमधील मेदांता रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अनेक दिवसांपासून शुगर आणि कार्डिओची समस्या आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 6:48 pm

Web Title: mulayam singh yadav has been admitted at yashoda hospital ghaziabad msr87
Next Stories
1 २०० कोटींच्या लग्नानंतर हिल स्टेशन झाले डम्पिंग ग्राऊंड, जमला ४००० किलो कचरा
2 डेरा प्रमुख राम रहीमला मिळणार ४२ दिवसांचा पॅरोल
3 ‘मोदीजी नवीन भारत तुमच्याकडेच ठेवा, आम्हाला आमचा जुना भारत द्या’
Just Now!
X