मुझफ्फरनगरमधील धार्मिक दंगलींवेळी प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे लखनौमधील आमदार सुरेश राणा यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. राणा यांना पोलिसांनी अज्ञातस्थळी नेले आहे.
तीन आठवड्यांपूर्वी मुझफ्फरनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये दंगल भडकली होती. त्यानंतर राज्य सरकारने नेमलेल्या पथकाकडून या दंगलीची चौकशी सुरू करण्यात आली. दंगल भडकल्यानंतर अटक करण्यात आलेले राणा हे पहिले आरोपी आहेत. राज्यातील एकूण १६ राजकारण्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. ज्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे, त्या सर्वांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2013 रोजी प्रकाशित
मुझफ्फरनगर दंगल: प्रक्षोभक भाषणाबद्दल भाजपच्या आमदाराला अटक
तीन आठवड्यांपूर्वी मुझफ्फरनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये दंगल भडकली होती.

First published on: 20-09-2013 at 07:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muzaffarnagar riots bjp mla arrested for making hate speech