24 February 2021

News Flash

काँग्रेसनेच घडवली सुभाषचंद्र बोस यांची हत्या – साक्षी महाराजांचा खळबळजनक आरोप

पंडित नेहरु व महात्मा गांधींचा सुभाषचंद्र बोस यांच्या लोकप्रियतेसमोर टिकाव लागत नव्हता, असं देखील म्हणाले आहेत.

संग्रहीत

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून, खळबळ उडवून दिली आहे. “नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या काँग्रेसनेच घडवून आणली” असा आरोप त्यांनी भर सभेत केला आहे. विशेष म्हणजे हे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त उन्नाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केले आहे. यामुळे आता राजकीय वातारण तापयला सुरूवात झाल्याचे दिसत आहे.

साक्षी महाराज म्हणाले, “अवेळीच सुभाषचंद्र बोस यांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आलं होतं. माझा आरोप आहे की काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवली आहे. हे फक्त त्यांच्या लोकप्रियतेमुळे करण्यात आलं होतं. कारण, सुभाषचंद्र बोस यांच्या लोकप्रियतेसमोर पंडित नेहरू व महात्मा गांधी यांचा कुठच टिकाव लागत नव्हता.”

तसेच, “सुभाषचंद्र बोस ते व्यक्तिमत्व होतं ज्यांनी नारा दिला होता की, “तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा..” इंग्रज एवढे सरळ नव्हते की मागितल्यावर स्वातंत्र्य दिलं असतं. या स्वातंत्र्यासाठी अनेक जण शहीद झाले आहेत. रक्त सांडवून आपण स्वातंत्र्य मिळवलं आहे.” असं देखील साक्षी महाराज यांनी यावेळी बोलून दाखवलं.

“देशाच्या स्वातंत्र्य युद्धात सुभाषचंद्र बोस यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या मृत्यूबाबत अद्यापही गुढ का कायम आहे? पंडीत नेहरु यांनी चौकशी का केली नाही? त्यांच्या मृत्यूबाबतचे सत्य बाहेर यायला हवं.” असं देखील साक्षी महाराज म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 1:51 pm

Web Title: my allegation is that congress got subhash chandra bose killed sakshi maharaj msr 87
Next Stories
1 शेतकऱ्यांच्या नजरा दिल्ली पोलिसांकडे; दोन लाख ट्रॅक्टरची काढणार रॅली
2 खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा
3 ममतांसाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कपडा दाखवण्यासारखं; भाजपा नेत्याची टीका
Just Now!
X