प्राचीन नालंदा विद्यापीठाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन सोमवारी बिहारमध्ये होत आहे. एकेकाळी देशापरदेशातील विद्यार्थी याच विद्यापीठात शिकत होते. उद्यापासून तेथे वर्ग सुरू होत आहेत. नालंदा विद्यापीठ पुन्हा सुरू करण्याची मूळ कल्पना माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची होती.
नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती गोपा सभरवाल यांनी सांगितले की, उद्या सकाळी नऊ वाजता परिसंस्था व पर्यावरण विभागाचे वर्ग सुरू होतील. सध्या त्यात १५ विद्यार्थी असून ११ शिक्षक आहेत. सभरवाल म्हणाले की, गाजावाजा न करता नालंदा विद्यापीठ सुरू करण्यात येत आहे याचे कारण शिक्षक व विद्यार्थी यांना स्थिरस्थावर व्हायला वेळ मिळाला पाहिजे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या १४ सप्टेंबरला विद्यापीठास भेट देत आहेत. विद्यापीठात आज विद्यार्थ्यांचा तीन दिवसांचा माहिती कार्यक्रम पूर्ण झाला. या विद्यापीठात जे विभाग आहेत तेथे प्रवेश घेण्यासाठी देशभरातून हजारो अर्ज आले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2014 रोजी प्रकाशित
नालंदा विद्यापीठ आजपासून सुरू
प्राचीन नालंदा विद्यापीठाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन सोमवारी बिहारमध्ये होत आहे.
First published on: 01-09-2014 at 03:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nalanda university to be inaugurated today