गुजरातमधील दुष्काळग्रस्त भागात जलसंधारण कामांवर केंद्राच्या निधीच्या खर्चावरून केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश आणि गुजरात सरकारमध्ये वाद सुरू आहे. नरेंद्र मोदी यांना या निधीच्या खर्चाबाबत चुकीची माहिती असल्याचे रमेश यांनी सांगितले. केंद्राच्या महत्त्वाकांक्षी अशा एकात्मिक जलसंधारण व्यवस्थापन कार्यक्रमावर केंद्राचा निधी खर्च करण्यात गुजरात सरकारला अपयश आल्याचा ठपका ग्रामविकासमंत्र्यांनी ठेवल्यावर गुजरात सरकारने आपली बाजू मांडत हा दावा फेटाळून लावला होता. त्यावर जयराम रमेश यांनी  ग्रामविकास मंत्रालयाने वस्तुस्थिती मांडली आहे, ती संकेतस्थळावर कुणालाही पाहता येईल असे सांगत गुजरात सरकारला चपराक लगावली आहे.