गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणूकांच्या निकालांचे कल पाहता भाजपला आघाडी मिळाली आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसचाही चांगलाच प्रभाव पाहायला मिळाला. हाच धागा पकडत आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी एक ट्विट करत सर्वांचेच लक्ष वेधले.
आजच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल कुमार विश्वास यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपचे अभिनंदन केले आहे. त्यासोबतच त्यांनी भाजपला ‘काँटे की टक्कर’ देणाऱ्या काँग्रेसचेही अभिनंदन केले आहे. या निकालांमधून देशातील राजकारण आणि राजकीय नेते सर्वांनीच सकारात्मक शिकवण घ्यावी. असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले. तसेच त्यांनी गुजरातमध्ये एकाकी झुंज देणाऱ्या ‘आप’च्या उमेदवारांचेही कौतुक केले.
आज के #ElectionResults में विजय के लिए @BJP4India को बधाई @INCIndia को बेहतर विपक्षी संघर्ष प्रस्तुत करने हेतु शुभकामनाएँ.आशा है देश की राजनीति और राजनेता इन दोनों चुनावों से सकारात्मक सबक़ और संकेत लेगें.गुजरात @AamAadmiParty प्रत्याशियों के एकात्म संघर्ष को प्रोत्साहन
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) December 18, 2017
लोकसभा निवडणूकांसाठीचा ट्रेलर समजल्या जाणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील या निवडणूकांमध्ये भाजपला मिळालेले यश पाहता देशभरात विविध ठिकाणी असणाऱ्या कार्यालयांमध्ये सध्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी ढोकळा, फाफड्याची चव चाखत हे यश साजरा केले, तर कोणी ढोल-ताशांच्या गजरात या यशाची ग्वाही दिली. मुख्य म्हणजे या अटीतटीच्या लढतीमध्ये काँग्रेसने दिलेली झुंज पाहता भाजपच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरणही पाहायला मिळाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 18, 2017 12:26 pm