23 April 2019

News Flash

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नीचे निधन

कुलसुम नवाज यांच्यावर लंडन येथील हार्ले स्ट्रीट क्लिनिकमध्ये जुलै २०१४ पासून उपचार सुरू होते.

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारागृहात बंद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी बेगम कुलसुम यांचे मंगळवारी लंडनमध्ये निधन झाले.

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारागृहात बंद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी बेगम कुलसुम (वय ६८) यांचे मंगळवारी लंडनमध्ये निधन झाले. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या अशी माहिती पाकिस्तान मुस्लीम लीगचे (नवाज) अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी माध्यमांना दिली. कुलसुम नवाज यांच्यावर लंडन येथील हार्ले स्ट्रीट क्लिनिकमध्ये जुलै २०१४ पासून उपचार सुरू होते. सोमवारपासून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते.

ऑगस्ट २०१७ मध्ये त्यांना घशाचा कॅन्सर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. कुलसुम नवाज यांचा एप्रिल १९७१ मध्ये नवाज शरीफ यांच्याशी विवाह झाला होता.

First Published on September 11, 2018 5:11 pm

Web Title: nawaz sharif wife kulsoom nawaz passes away london